District Updates Gondiya - दोघे कोरोनामुक्त होऊन घरी परतले
गोंदिया जिल्ह्यात आज नवा रुग्ण नाही
जिल्ह्यात आज दोघे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.नवा कोरोना बाधित रुग्ण आज आढळून आला नाही.जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ,ही जिल्ह्यासाठी निश्चितच समाधानाची बाब आहे.जिल्ह्यात आता केवळ 17 रुग्ण कोरोना क्रियाशील आहे.
गोंदिया ता. ५ : (जिमाका) जिल्ह्यात आज दोघे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.नवा कोरोना बाधित रुग्ण आज आढळून आला नाही.जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ,ही जिल्ह्यासाठी निश्चितच समाधानाची बाब आहे.जिल्ह्यात आता केवळ 17 रुग्ण कोरोना क्रियाशील आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या 1065 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये 69 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.तर 10 अहवालाची प्रतीक्षा आहे.
पहिल्या बाधित रुग्णाला 10 एप्रिल रोजी, दोन रुग्णांना 28 मे रोजी, 25 रुग्णांना 29 मे रोजी. चार रुग्णांना 30 मे रोजी, 31 मे रोजी 6 रुग्णांना ,1 जून रोजी सहा रुग्णांना, 2 जून रोजी 4 रुग्णांना, 3 जून रोजी 2 रुग्णांना आणि आज 5 जून रोजी 2 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 52 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे .
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित जे रुग्ण आढळुन आले आहे ते 26 मार्च,(1 रुग्ण),19 मे (2 रुग्ण) ,21 मे (27 रुग्ण),22 मे (10 रुग्ण) ,24 मे ( 4 रुग्ण), 25 मे ( 4 रुग्ण ), 26 मे (1 रुग्ण), 27 मे (1 रुग्ण),28 मे (9 रुग्ण), 29 मे ( 3 रुग्ण), 30 मे (4 रुग्ण) ,31 मे (1 रुग्ण), 2 जून (2 रुग्ण ) असे एकूण 69 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
आज 5 जून रोजी जिल्ह्यातील दोन कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने घरी परतले.एक रुग्ण गोरेगाव आणि दुसरा रुग्ण सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.आज नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 69 आहे.यामध्ये कोरोना क्रियाशील रुग्ण 17 आहे.
जिल्ह्यात 24 क्रियाशील प्रतिबंधित क्षेत्र आहे.यामध्ये गोंदिया तालुका - नवरगाव/कला, कटंगी, परसवाडा,चुटीया,रजेगाव व गजानन कॉलोनी व काटी. सालेकसा तालूका -धनसुवा व बामणी .सडक/ अर्जुनी तालुका - तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव,पांढरवाणी, गोपालटोली.
गोरेगाव तालुका - गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक ,आंबेतलाव तिरोडा तालुका - तिरोडा.अर्जुनी/मोरगाव तालुका - करांडली,अरुणनगर, सिलेझरी ,बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे
जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 2303 आणि गृह अलगीकरणात 1996 अशा एकूण 4299 व्यक्ती अलगीकरणामध्ये आहे.
डॉ.श्याम निमगडे
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रत्येकाने फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करणे,आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणे,चेहऱ्यावर व नाकावर रुमाल किंवा मास्कचा वापर करणे,वारंवार हात स्वच्छ धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी सांगितले.
No comments