जागतिक परिचारिका दिनी गरजूंना अन्नधान्य वाटप
नागपूर : गड्डीगोदाम खलाशी लाईन येथे युवा क्रांती सामाजिक संस्थातर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे यांच्या सहकार्याने अन्न धान्य वाटप करण्यात आले.
देशभरात लॉकडाउन असल्याने सगळेच व्यवसाय ठ्ठप झाले वस्त्यांमध्ये राहणारे रोजंदारी, कामकाज करणाऱ्यांसमोर खाण्या पिण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता. सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने तांदूळ, तेल, सोयाबीन वळी, बिस्कीट, केळ वाटप करण्यात आले..
आजही खलासी लाईन येथील बरेच नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील दानशूर व्यक्तीने यांना मदत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विशाल गोंडाणे यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल गोंडाणे, कायदा सल्लागर ऍड.विलास राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, शरद साखरे, सोनू जनबंधु, दीपक खोब्रागडेसह , पोलीस कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments