राधेश्याम बहुउद्देशीय सेवा संस्थातर्फे गरजुंना अन्नधान्य वाटप : डॉ. किरण मेश्राम
![]() |
राधेश्याम बहुउद्देशीय सेवा संस्थाचे पदाधिकारी गरजुंना अन्नधान्य वाटप करतांना |
नागपूर ,ता.१९ : उत्तर नागपुरातील नारी रोड राजगृह नगर येथील राधेश्याम बहुउद्देशीय सेवा संस्थाच्यातर्फे शहरात विविध ठिकठिकाणी अडचणीत असलेल्या गरजुं नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
देशभरात लॉकडाउन असल्याने नागपुर शहरातील नागसेन वन , राजनगर झोपडपट्टी , मानकापूर , राजगृह नगर ,नारी, तक्षशिला नगर , कामगार नगर , कपिल नगर, येथील वस्त्यांमध्ये रोजंदारी कामकाज करणाऱ्यांसमोर खाण्या पिण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता.
राधेश्याम बहुउद्देशीय सेवा संस्थाच्या पुढाकाराने तांदूळ , पीठ, डाळ, तेल , तिखट, असे संपूर्ण किट संस्थेच्या सदस्यांनी तीन लोकांचे ग्रुप तयार करून संपूर्ण किट चे वाटप केले. महाकश्यप बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त खीर वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेकडून कोरोना कोविद १९ संसर्गजन्य रोगा विषयी नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली तसेच सोशल डिस्टंसीगचे महत्व पठवून सांगण्यात आले.
मानव सेवा हीच खरी सेवा आहे असे प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य समजून खारीचा तरी वाटा उचलायला पाहिजे असे मत संस्थेचे सचिव डॉ. किरण मेश्राम यांनी मत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचेसचिव डॉ. किरण मेश्राम ,संतोष अंबादे, सुप्रिया इंगडे , दीपा साखरे , मीना उके, प्रज्ञा मेश्राम , सौरभ कोठारे , सुमेध मेश्राम आदी सदस्यांनी सहकार्य केले.
No comments