Breaking News

पंचवर्गीय बुद्ध विहारतर्फे नागरिकांना पुलाव वाटप



नागपूर ,ता. ११ :  कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेले अनेक दिवस नागपूर बंद आहे. गोरगरीब झोपडपट्टीतील  नागरिकांना  उपासमारीला तोंड द्यावे लागत असताना रिपब्लिकन नगर येथे पंचवर्गीय बुद्ध विहारात जनजागृती महिला मंडळाने पुढाकार घेत नागरिकांना केले पुलावाचे वाटप केले.  

नागपूर शहरांत लॉक डाऊन असल्यामुळे गोरगरीब जनतेचे अतोनात हाल होत आहेत. विशेष करून ज्यांचे हातावर पोट आहे. रोज कमावणार रोज खाणारयात रिक्षावाले, घरकाम  करणाऱ्या महिला, हमाल, निराधार महिला, वयोवृद्ध लोक, विधवा महिला, अपंग यांचे अन्न पाण्या वाचून उपास मार होत आहे. 

अशा लोकांना मदती साठी पंच वर्गीय बुद्ध विहाराच्या आणि जनजागृती महिला मंडळाच्या अध्यक्ष वर्षा मेश्राम,  सेक्रेटरी अर्चना राऊत, बेबी वानखेडे,  त्यांच्या महिला कार्यकर्ते यांनी पुलाव तयार करून त्यांचे वाटप करून गोर गरिबांना दिलासा दिला. 

नागरिकांना तांदूळ, व इतर साहित्य दिले तरी तो शिजवण्यासाठी गॅस लागतो. आज गॅस परवडणार नाही  ते मिळविण्यासाठी  हजार रुपये मोजावे लागतात. याचा विचार करून यांनी पुलाव तयार करून वाटप केले.  महात्मा जोतिबा फुले  व सावित्री बाई फुले यांच्या  प्रतिमेचे पूजन करून हार घालून अभिवादन  केले. 

यावेळी नागरिकांनी पंच वर्गीय बुद्ध विहार कार्यकर्त्या महिलांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. 

नागरिकांना करोना नवीन कोविड १९ व्हायरसची माहिती देऊन, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. करोना झाल्यास तो लपवू नका.तो बरा होतो. तसेच मास्क वापरण्याचे आवाहन जनजागृती महिला मंडळाच्या अध्यक्ष वर्षा मेश्राम यांनी केले.


No comments