स्थलांतरित मजुरांनी संयम बाळगून लॉकडाऊन पाळावा : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
#RAMDAS ATHAWALE#
कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने लॉक डाऊनच्या काळात प्रवासाला बंदी घातली आहे. स्थलांतरित मजुरांना शहरांमधून त्यांच्या गावी पाठविण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाचा फैलाव देशभर अधिक होण्याचा धोका असल्यामुळे स्थलांतरित मजुरांनी संयम बाळगून लॉकडाऊन पाळावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.
मुंबई दि. १६ : कोरोना हा जीवघेणा रोगाचे संकट देशावर घोंघावत असताना त्यापासून वाचण्याचा लॉकडाऊन हाच उपाय आहे. जनतेचे जीव वाचविण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने लॉक डाऊनच्या काळात प्रवासाला बंदी घातली आहे. स्थलांतरित मजुरांना शहरांमधून त्यांच्या गावी पाठविण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाचा फैलाव देशभर अधिक होण्याचा धोका असल्यामुळे स्थलांतरित मजुरांनी संयम बाळगून लॉकडाऊन पाळावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.
बांद्रा येथे मजुरांची झालेल्या गर्दी ची चौकशी व्हावी मात्र या प्रकरणी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेले ट्विट चुकीचे निषेधार्ह आहे. त्यांनी लॉक डाऊन करण्याआधी पंतप्रधानांनी ट्रेन सुरू केल्या पाहिजे होत्या असे चूकीचे आणि पांतप्रधानांच्या भूमीकेचा अवमान करणारे ट्विट केले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र आदित्य ठाकरे हे मंत्रिपदी असताना असे चुकीचे ट्विट करीत असल्याची नापसंती ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
स्थलांतरित मजुरांसह अनेकांच्या अडचणी आहेत. मात्र या अडचणींवर संयम बाळगून मात केली पाहिजे. मुंबई सारख्या महानगरात जे स्थलांतरित मजूर अडकलेत त्यांना छोटी घरात राहावे लागत आहे. त्यांना पुरेसे अन्नपाणी नाही. सोशल डिस्टन्स पाळण्यासारखी घरे आणि जागा त्यांचाकडे नाही. मजुरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असक्याची सरकार ला जाणीव आहे त्यांची व्यवस्था करण्याचा माझा प्रयत्न आहे. बांद्रा येथे जमलेल्या मजुरांना अन्नधान्य भोजन देण्याबाबत काही सामाजिक संस्था एनजीओ ची मदत घेण्याचा माझा प्रयत्न आहे.मात्र कोरोनावर कायमची मात करण्यासाठी मजुरांनी लॉक डाऊनला साथ द्यावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.
No comments