कोरोना विषाणूपासून स्वतःला सुरक्षित ठेवा ; समर्पण वेल्फेयर फाउंडेशनने जनजागृतीचा संदेश दिला
![]() |
उत्तर नागपूरातील स्लॅम वस्त्यांमध्ये बॅनर्ससह व माहितीपत्रक वाटप करतांना समर्पण वेल्फेयर फाउंडेशनचे सदस्य |
नागपूर, ता. २६ : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासनामार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी देखील नागरिकांनी कोरोना विषाणूबाबत गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर फिरताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कर्तव्ये म्हणून समर्पण वेल्फेयर फाउंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेत. उत्तर नागपूरातील स्लॅम वस्त्यांमध्ये महितीदर्शक बॅनर, माहितीपत्रक वाटप करून कोरोना विषाणू पासून स्वतःला सुरक्षित ठेवा असा नागरिकांना जनजागृतीचा संदेश दिला.
राज्यात कलम १४४ लागू झाले आहे. या युद्धयजन्य स्थितीत जनतेला आरोग्य सेवा देत कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाला न घाबरता शासकीय रुग्णालय, मनपा रुग्णालय, नगर परिषद रुग्णालय व जिल्हा परिषद रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, महाराष्ट्रातील पोलीस व इतर कर्मचारी हे आपले कर्तव्य चोख बजावित आहेत. तसेच, कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी डोळयात तेल घालून अहोरात्र झटणाऱ्या पोलीस व जिल्हा प्रशासन आपले कर्तव्य चोखपणे बजावीत आहेत.
शासनाच्या निर्णयांचे अनुपालन करीत दोन ते तीन सदस्यांच्या गटात विभाजीत होऊन सर्व सुरक्षा साधनसामग्रीसह नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी समर्पण वेल्फेयर फाउंडेशनच्या सदस्य राकेश मेश्राम, संकेत रामराजे, संदीप शेंडे, सूरज कांबळे, सचिन तिरपुडे, निलेश मेश्राम, नीलकंठ काटधरे सहभागी झाले होते.
No comments