नागपूर माध्यमिक विद्यालयात कल्याणी प्रथम
नागपूर,ता.१४ कल्याणी मसराम या विद्यार्थिनींच्या वडिलांचा निधनानंतर आई चार घरची भांडी घासून घर चालविले अश्या कठीण परीस्थितीवर मात करून कल्याणी शाळेतून प्रथम आली. पोलीस लाईन टाकळी येथील नागपूर माध्यमिक विद्यालय शाळेतील निकाल ८७ टक्के निकाल लागला.शाळेतून एकूण ४५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. कु.कल्याणी मसराम ७३.८० टक्के , विशाल बन्सोड ७१.८० प्रथम व दुसरे उत्कृष्ठ गुणवंत विद्यार्थनचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक विनोद पुरकाम, सौ. वंदना नेमाडे, सौ. नलिनी गेडाम, श्री घारपुरे व सहकारी शिक्षक उपस्थित होते
No comments