Breaking News

कचारी सावंगा येथे अस्थीकुंडाचे लोकार्पण

*कचारी सावंगा येथे रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते अस्थीकुंडाचे लोकार्पण

नागपूर,ता.२३ : कोंढाळी जवळ असलेल्या कचारी सावंगा येथे माजी मंत्री तथा जिल्हा अध्यक्ष राकाँपा नागपूर यांच्या हस्ते अस्थीकुंडाचे लोकार्पण करण्यात आले .
  मुळातच  कचारी सावंगा या गावाला राष्ट्रीय विचाराचा वारसा गावात अनेक तरूण भारतीय सैन्यात कार्यरत आहेत . काही माजी सैनीकांचेहि गावात वास्तव्य आहे . 1962च्या चीन युद्धात मेहर नावाचा तरूण सैनीक शहीद झाला. तो या गावाचा आदर्श आणि प्रेरणा. गावातील विद्यार्थी विवीध क्षेत्रात प्रगत. गावातील  अनेक मुल अधीकारी उच्चपदावर . देशभ्रतार नावाची तरूणी आएस अधीकारी आहे. अस प्रगत गाव. या गावात अशोक बाभुळकर नावाचा समाज सुधारक त्यांने ज्ञानेश्वरदादा रक्षक यांचा पुण्यनगरीच्या धुन पुरवणीत लेख वाचला " अस्थीकुंड गावा गावात व्हावे ! तुझ गावच नाही का तीर्थ" हा लेख राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर आधारीत होता. अशोक बाभुळकरयांच्या कुटुंबीयांनी आई वडीलांच्या स्मृती प्रीत्यर्थ हे अस्थीकुंड गाडगे बाबा तुकडोजींच्या विचारांना समर्पित केल. हे कुंड गावाच्या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे.      
 अध्यक्षपदावरुन बोलतांना माजीमंत्री रमेश बंग यांनी या उपक्रमाची स्तुती करीत गावतीर्थ बनवत मानवाला मानवतेची प्रेरणा बाभुळकर कुटुंबाने दीली.
कचारी सावंगा पंचक्रोशीतील लोकांना आई वडीलांच्या अस्थी विसर्जनासाठी दुर तीर्थ क्षेत्री जाण्याची गरज राहली नाही. त्यांच्या मृताबदलच्यां भावनांना यामुळे समाधान मीळेल. आर्थीक विवंचने पासुन ग्रामीण शेतकरी शेतमजुर वाचेल. हे खर पुण्यांच आणि सेवेच आणि गावाला तीर्थाच खर स्वरूप निर्माण होणार आहे. अशा शब्दांत या उपक्रमाचा गौरव केला.
 यावेळी मान्यवरांच्या हस्ते विवीध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोक बाभुळकर, विजय बाभुळकर,ज्ञानेश्वर रक्षक,रवि मानव, आनंदपाल अंबर्ते, जयंत टालाटुले, बंडू इंगोले, संजय डांगोरा, निलेश दुबे, ओमेश्वर डांगोरा, शिवदयाल दुबे,  पवार गुरूजी,पठान साहेब, निलकंठराव ढोरे आदी सह शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments