वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
महाबोधी महाविहार मुक्त करा विक्रेत्यांची मागणी
नागपूर,ता.१४ : इंदोरा चौक येथील वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
वृत्तपत्र विक्रेते यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच केक कापून अभिवादन करण्यात आले. भारताचे नागरिक एक आहोत, महाबोधी महाविहार मुक्त करा असे अशी भावना वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यक्त केले. विक्रेत्यांना पोह आणि केक वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेकरिता अश्विन अंबादे, शरद साखरे, कुणाल चिंचखेडे, मनोज कैथवास, प्रवीण शेंडे, रोहित अंबादे, जय गुप्ता, महेश मेश्राम, आशिष गजभिये,सचिन ठवरे, सतेंद्र गोडबोले यांनी परिश्रम घेतले. यावेळी इंदोरा वृत्तपत्र सेन्टरचे अध्यक्ष राहुल खांडेकर, नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेचे सचिव शैलेंद्र वागदे तसेच मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
Nagpur, 14: On the occasion of the 134th birth anniversary of Bodhisattva Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, the Preamble of the Indian Constitution was read by the newspaper vendors at Indora Chowk.
Newspaper vendors offered wreaths to the portrait of Dr. Babasaheb Ambedkar and cut a cake to pay tribute. The sentiments expressed to the newspaper vendors were that we are the citizens of India, liberate the Mahabodhi Mahavihar..
On this occasion, Ashwin Ambade, Sharad Sakhre, Kunal Chinchkhede, Manoj Kaithwas, Praveen Shende, Rohit Ambade, Jay Gupta, Mahesh Meshram, Ashish Gajbhiye, Sachin Thaware, Satendra Godbole worked hard for the success of the program. On this occasion, Rahul Khandekar, President of Indora Newspaper Center, Shailendra Vagde, Secretary of Nagpur District Newspaper Association, and a large number of newspaper vendors were present.
No comments