'लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, ता.६ : मानकापूर येथे ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.मनपा मंगळवारी झोन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे सामाजिक कार्यकर्ता अभय राऊत यांच्या पुढाकाराने ताजनगरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
ताजनगर येथील १८ ते ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २०० नागरिकांनी लसीकरणाच लाभ घेतला . कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. दिनांक ८ ते १० सप्टेंबर दरम्यान ही मोहीम ताजनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व ताजनगरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश अश्रफ, नर्स रेश्मा नाझ, सुनीता जंगाडे, देव बोन्द्रे, समन्वयक चंद्रशेखर निखारे, आंगवाडी सेविका निलोफर, गजभिये, भगत, सावरकर, कांचन मागरडे, काजल जंगाडे, रंजु हरिनखेडे, अनुराग राऊत, सुशील साखरे, राजू माधवगडे, रुपेन चौधरी, सुमित पांडे, रितेश शिवपेठ यांनी परिश्रम घेतले.
Spontaneous response of citizens to the 'Vaccination at Your Doorstep' campaign
Nagpur : A 'Vaccination at Your Doorstep' campaign has been launched in Mankapur. The aim is to vaccinate all citizens between the ages of 18 and 45 in Tajnagar. The campaign received a spontaneous response from the citizens on the first day of vaccination. 200 citizens benefited from vaccination alone. There is no alternative but vaccination to prevent the spread of the corona epidemic. So the 'Vaccination at Your Doorstep' campaign has been launched. The campaign will be implemented from September 8 to 10 in all the Tajnagar coming under the Primary Health Center at Tajnagar. The medical officer for this campaign, Dr. Dinesh Ashraf, Nurse Reshma Naz, Sunita Jangade, Dev Bondre, Coordinator Chandrasekhar Nikhare, Angwadi Sevika Nilofar, Gajbhiye, Bhagat, Savarkar, Kanchan Magarde, Kajal Jangade, Ranju Harinkhede, Anurag Raut, Sushil Sakhre, Raju Madhavgade, , Riteish Shivpeth worked hard.
No comments