युथ फॉर रेव्हेन्यूशनतर्फे हर्षवर्धन मेश्राम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
![]() |
हर्षवर्धन मेश्राम |
उंच पुरा गोरापान नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवणारा, प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कामठीतील महेश स्टडी सर्कल केंद्र उभारून केंद्र सरकार, राज्य सरकार, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, या क्षेत्रात १०० च्या वर विद्यार्थ्यांना घडविले, आत्मरक्षणाचे धडे देत कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट मिळविणारे हर्षवर्धनवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा प्रभाव होता.
त्यासाठी त्यांनी श्रीलंकात श्रामनेर दीक्षा घेऊन योगा मेडीटेशन, बोधिस्ट कल्चरचा प्रसार प्रचार करण्याचे काम करीत बौद्ध धम्माचा विचार लोकांपर्यंत कसा रुजवता येईल, यासाठी प्रयत्नशील असणारे आम्हचे मित्र हर्षवर्धन मेश्राम वय ३७ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले अजूनही विश्वास बसत नाही यांचे निधन झाले. त्यांचा अतिथी देव भव यांचावर मोठा विश्वास व आदर होता. नेहमी मित्र मंडळी व परिवारासाठी उत्तम सयंपाक करायला आवडत असे.
भटके, बेगर लोक आपल्या घरी कसे पोहचतील याचे नेहमी विचार करीत असत सामाजिक भान ठेवत सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेत मोठे नाव मिळवले त्यांच्या कार्याला सलाम. ते आज आपल्यात नाही पण त्यांच्या कार्यामुळे त्यांचा विचारामुळे ते आपल्यात नेहमी जिवंत राहतील.
अल्प परिचय : आपले विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ नागपूर संघांचे कार्याध्यक्ष मनोहर निंबेकर हयांचे जावई हर्षवर्धन मेश्राम वय ३७ मूळचे कामठी राहणारे केरळ येथे नेव्ही मध्ये सेवाकार्यरत असतांना दीर्घ आजाराने दि. 26/9/2021 रोजी त्यांचे निधन झाले मेश्राम व निंबेकर कुटूंबावर कोसळलेल्या दुःखात समस्त विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ नागपूर सहभागी असुन त्यांचे आत्म्यास शांती तथा सदगती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली
पवन पाटील, युथ फॉर रेव्हेन्यूशन नागपूर
मो.+91 90486 98470
No comments