Breaking News

'ऊर्जाफुले ' काव्यसंग्रहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

'ऊर्जाफुले ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मान्यवर 

नागपुर  : राज्याच्या वीज निर्मिती कंपनीत भुसावळ येथे मुख्य अभियंता असणारे विवेक पांडुरंग रोकडे यांच्या 'ऊर्जाफुले' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या बेझनबाग  येथील निवासस्थानी हा  प्रकाशन सोहळा पार पडला.

 पालकमंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी श्री. रोकडे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. ऊर्जा विभागात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेला या पुस्तकाच्या माध्यमातून न्याय दिल्याची प्रशंसा त्यांनी केली.
निसर्ग व मानवी मनाच्या संवेदना व्यक्त करणाऱ्या या काव्यसंग्रहाला 'ऊर्जाफुले' हे समर्पक नाव रोकडे यांनी दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्यातील कलागुणांना जपावेत, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच ऊर्जा विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Publication of 'Urjafule' collection of poems by the Guardian Minister

Nagpur: Vivek Pandurang Rokade, who is the Chief Engineer at Bhusawal in the state power generation company, has published a collection of poems titled 'Urjafule'. The release ceremony was held at  Guardian Minister Dr. Nitin Raut's residence in Bezenbagh.
      Guardian Minister Dr. Raut called on Shri. Appreciated Rokade's literary work. He praised his poetic talent for judging his poetic talent through this book, even while serving as chief engineer in the Department of Energy. Rokade has given the appropriate name 'Urjaphule' to this collection of poems which expresses the feelings of nature and human mind. The Guardian Minister also clarified that every employee should cherish their artistic talents. District Collector Ravindra Thackeray and many officials and employees of the energy department were present on the occasion.

ليست هناك تعليقات