Breaking News

डॉ. सतीश पावडे यांची सेन्साँर बोर्डाच्या सदस्य पदी नियुक्ती

 



एन७ न्यूज व्हॉइस
वर्धा, ता.17: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक डाँ. सतीश पावडे यांची महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने  नाट्य सेन्साँर(रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ) बोर्डाच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती केली आहे.

डॉ. सतीश पावडे हे वर्धा येथील महात्मा गांधी ईंटरनँशनल हिंदी विद्यापिठाच्या परफाँर्मिंग आर्ट्स (फिल्म अँड थिएटर स्टडीज)विभागात वरीष्ठ सहायक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. नाटक विषयक त्यांची 24 पुस्तके प्रसिद्ध झाली असून 30 नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचे नावावर आहेत. 10 हून अधिक डाँक्युमेन्ट्रीज आणि शाँर्ट फिल्म्सचे लेखन दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मराठी विश्वकोषाच्या नाट्य ज्ञान मंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
स्मिता पाटील स्मृति पुरस्कार, मँग्नम आँनर पुरस्कार, मामा वरेरकर, पु.भा.भावे पुरस्कारासह युनेस्को क्लब्स आणि डे ड्रीम थिएटर एक्सीलेंस आँनर (श्रीलंका) या ईंटरनँशनल सन्मानानेही त्यांना या पुर्वी गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्याच साहित्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ठ नाट्य आणि नाट्य समीक्षा लेखनाचा पुरस्कार दोनदा त्यांना बहाल करण्यात आला आहे. तर कामगार मंडळाच्या राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचा पुरस्कार ही त्यांना तिनदा  (हँट्रिक) प्राप्त झाला आहे.

Appointment of Dr. Satish Pavade as a member of Drama Censor Board

N7 News Voice
Wardha, 17th: Well known playwright, director and drama critic from Maharashtra Dr. Satish Pavade has recently been appointed by the Ministry of Culture, Government of Maharashtra as a member of the Board of Drama Censorship.

Dr. Satish Pavade is a Senior Assistant Professor in the Department of Performing Arts (Film and Theater Studies), Mahatma Gandhi International Hindi University, Wardha. He has published 24 books on drama and has written and directed 30 plays. He has written and directed more than 10 documentaries and short films. He has also worked as a consultant for the Marathi Encyclopedia's Natya Gyan Mandal. She has also been honored with Smita Patil Memorial Award, Magnam Honor Award, Mama Warerkar, P.Bhave Bhave Award, UNESCO Clubs and Day Dream Theater Excellence Honor (Sri Lanka).
He has twice been awarded the Maharashtra Government's Sahitya Sanskriti Mandal's Best Drama and Drama Review Writing Award. He has won the award for best playwriting in the Kamgar Mandal's state drama competition three times (Hantrick).


ليست هناك تعليقات