Breaking News

आय.टी.आयमध्ये प्रवेशासाठी ११ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज

 इंदोरा आय.टी.आयमध्ये प्रवेशासाठी११ जुलैपर्यंत  ऑनलाइन अर्ज

Indora ITI

नागपूर,ता.७ : उत्तर नागपुरातील इंदोरा शासकीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे  विद्यार्थ्यांना
प्रवेश मिळविण्यासाठी ११ जुलै पर्यंत ऑनलाइन  अर्ज मागविण्यात आले आहे. इंदोरा या संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जुन २०२३ पासून सुरु झालेली असून दहावी उत्तीर्ण इच्छुक  विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यांत आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी या संस्थेमध्ये येऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टण्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यांत येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यांत येत आहे. सद्या उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदोरा, नागपूर येथे एक वर्षीय  फॅशन डिझाईंग टेक्नॉलॉजी, कोपा हे अभ्यासक्रम व इलेक्ट्रीशियन, फिटर व मशिनिष्ट हे दोन वर्षिय अभ्यासक्रम आहेत. सदर संस्थेत ८० टक्के जागा हया अनुसुचित जाती व नवबौध्दाच्या मुलामुलीकरिता राखीव आहेत व २० टक्के जागा इतरांसाठी राखीव आहेत. आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे शासनस्तरांवर प्रस्तावित करण्यांत आलेले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी admission.dvet.gov.in हया संकेतस्तराळवर ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भेट देवून अर्ज सादर करावेत असे शासकीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदोरा नागपूर येथील प्राचार्य  केतन कुमार सोनपिपरे यांनी आवाहन केले.

Apply online till 11th July for admission in Indora ITI

Nagpur, 7  : To students at Indora Government Higher Level Industrial Training Institute in North Nagpur
Online application is invited till 11th July to get admission.
     Indora Nagpur institute admission process has started from 12th June 2023 and 10th passed candidates
Online application form should be submitted by 11th July 2023 by visiting the website admission.dvet.gov.in. The information booklet of standardized procedure prepared for admission to industrial training institutes has been made available in online format on the above website. After registering the application, the candidates should come to this institution and confirm their application and then submit the options. Counseling is being done in industrial training institutes regarding various aspects of the admission process. In this, the candidates are being given information about various business courses.

Presently Higher Level Industrial Training Institute, Indora, Nagpur offers one year course in Fashion Designing Technology, COPA and two year course in Electrician, Fitter and Machinist. In the said institution, 80 percent seats are reserved for Scheduled Castes and Neo-Buddhists and 20 percent seats are reserved for others. It has been proposed at the government level to increase the monthly stipend given to the ITI admitted candidates. Ketan Kumar Sonpipere, Principal, Government Higher Level Industrial Training Institute, Indora Nagpur appealed to the students to submit their applications online till July 11, 2023 at admission.dvet.gov.in.

ليست هناك تعليقات