इंदोऱ्यात संत गाडगेबाबा महाराज जयंती
विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतांना कांचन वाणीसह आदी मान्यवर |
नागपूर,ता.२३ : इंदोरा मायनगर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण कार्यालय, पर्यावरण नीती मूल्य व स्पार्टन स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी विभागाचे रविकांत गौतमी, नागलोकचे धम्मचारी तेजदर्शन, कामगार कल्याण अधिकारी कांचन वाणी, प्रभाग ७ च्या नगरसेविका भावना संतोष लोणारे, पर्यावरण नीति मूल्यचे संस्थापक ओंकार धवले, उपाध्यक्ष, सुशांत खोब्रागडे उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर व्याख्यान तसेच पर्यावरण जनजागृतीवर नुक्कड नाट्य पर्यावरण नीति मूल्यचे सभासद निनाद भागवतकरी,सोहल जांभुळकर,आयुष वानखेड़े,संदेश नंदेश्वर, रूपाली अंबादे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम ब्रम्हे यांनी केले. मिलिंद धोंगडे यांनी आभार मानले.
Sant Gadge Baba Maharaj Jayanti celebration in Indore
Nagpur, 23rd: Sant Gadge Baba Maharaj's birthday was celebrated at Indora Mainagar jointly by Maharashtra Workers Welfare Office, Environmental Policy Values and Spartan Sports Academy.
The chief guests of the program were Ravikant Gautami of Agriculture Department, Dhammachari Tejdarshan of Naglok, Kanchan Vani, Labor Welfare Officer, Santosh Lonare, Corporator Bhavana of Ward 7, Omkar Dhawale, Founder of Environmental Policy Values, Sushant Khobragade, Vice President.
ليست هناك تعليقات