पंचवर्गीय बुद्धविहारत वर्षावास समारोप संपन्न
नागपूर, ता. १ : उत्तर नागपुरातील रिपब्लिकन नगर गल्ली नं ९ येथील पंचवर्गीय बुद्ध विहार कमिटीतर्फे बुद्ध धम्म वर्षावास भिख्खू संघ यांच्या मार्गदर्शनात समारोप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव, पंचवर्गीय बुद्ध विहाराचे अध्यक्षा वर्षा मेश्राम उपस्थित होते.
महिलांनी स्वतःला असुरक्षित समजू नये पोलीस आपल्यासाठी सहाय्य करण्यास सदैव तत्पर आहेत. महिलांनी पोलीस ठाण्यात यायला घाबरू नये. आम्ही सहकार्य करू तक्रार दाखल करण्यासाठी केव्हाही मला येऊन भेटा अत्याचाराला आळा घालण्यात येईल. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले,
या प्रसंगी पंचवर्गीय बुद्ध विहार कमिटीतर्फे विहारात भन्ते खेमनंदा, भन्ते डिरा, भन्ते सुघदा, भन्ते अरिया, भन्ते संग्रा यांना चिवर दान, भोजनदान आणि दैनिक गरजेचे साहित्य वस्तू वाटप करण्यात आले. वर्षवास बुद्ध वंदना, भीम गीते गाऊन समारोप करण्यात आला. यावेळी उपासक, उपासिका पंचवर्गीय बुद्धविहारात महिला सभासद अर्चना राऊत, लता रामटेके, नगरसेविका भावना लोणारे, ममता गेडाम, दिपक वाहिले, नंदा कोटंगले, शांता कोटंगले, जितेंद्र वेलेकर, विनय वाघमारे, रितेश बन्सोड उपस्थित होते.
Panchavargiya Buddhaviharat Varshavas Samarop concludesNagpur, Tal. 1: The concluding program was held by the five-class Buddha Vihar Committee at Republican Nagar Street No. 9 in North Nagpur under the guidance of Buddha Dhamma Varshavas Bhikkhu Sangh. Vaibhav Jadhav, Senior Inspector of Police, Jaripatka Police Station and Varsha Meshram, President, Panchvargiya Buddha Vihara were present as the chief guests of the event. Women should not feel insecure.
The police are always ready to help you. Women should not be afraid to come to the police station. We will cooperate. Come and meet me anytime to lodge a complaint. Atrocities will be curbed. The senior police inspector said that on this occasion, the five-member Buddha Vihar Committee distributed Chivar donations, food donations and daily necessities to Bhante Khemnanda, Bhante Dira, Bhante Sughada, Bhante Aria and Bhante Sangra. Varshavas was concluded by singing Buddha Vandana, Bhim Gita. Women members Archana Raut, Lata Ramteke, Corporator Bhavana Lonare, Mamta Gedam, Deepak Wahile, Nanda Kotangle, Shanta Kotangle, Jitendra Velekar, Vinay Waghmare and Riteish Bansod were present in the worship.
ليست هناك تعليقات