Breaking News

कोकणातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची मदत..!

 

www.n7newsvoice.com
कोकणातील  पूरग्रस्त विद्यार्थ्यांना  दहा हजार रुपयांची मदतीचा चेक सुपूर्द करतांना जनजागृती महिला मंडळ अध्यक्षा वर्षा मेश्राम, पत्रकार बाबा रामटेके 

नागपूर :  महाभयंकर पुराचा सामाना कोकणातील लोकांनी केला. कुठे भुसखलन होऊन पूर्ण गाव गाडले गेले तर काही ठिकाणी संपूर्ण घरे उद्धवस्त झाली. लोकांच्या संसाराची राख रांगोळी झाली. या कठीण प्रसंगी नागपूरच्या वेगवेगळ्या महिला संस्था संघटना मदतीला धावून आल्या. त्यांनी मागच्या महिन्यात तीन चार टन घरगुती सामान, भांडी कपडे साड्या प्रत्यक्ष कोकणात जाऊन वाटप करून मदत केली.जनजागृती महिला विकास मंडळ, पंचवर्गीय बुद्ध विहार कमिटी, विश्व ज्योती बहुउद्देशीय जन कल्याण संस्था, वैशाली नगर मित्र परिवार सर्व नागपूर संस्था याच सर्व महिला संस्था यांनी पुन्हा कोकणातील विध्यार्थ्यांनसाठी दहा हजार रुपयाचा चेक कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हवाली केला. विध्यार्थी यांना वह्या, पेन दप्तर वाटप करण्या साठी ही मदत देण्यात आली. आणि आणखी मदत मुलांना पाठवण्याचे आश्वासन जनजागृती महिला मंडळ अध्यक्षा वर्षा मेश्राम यांनी दिले.
विद्यार्थ्यांना चेक सुपूर्द करण्यासाठी अध्यक्षा वर्षाताई मेश्राम मुद्दाम नागपूर येथून मुंबई येथे आल्या आणि त्यांनी कपिलवास्तु बुद्ध विहारात कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, दिपक पवार यांच्या हाती सुपूर्द केला. या प्रसंगी मंत्रालय पत्रकार बाबा रामटेके हे उपस्तित हॊते. प्रकाश मोरे यांनी नागपूरच्या सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षाताई मेश्राम,वैशाली  बांबोले,ममता गेडाम, उषाताई पाटील, संगीता टेम्बुरणे, लता रामटेके, दीप्ती नाईक,यांचे आभार मानले.

Ten thousand rupees help to flood affected students in Konkan ..!

Nagpur: The people of Konkan faced the catastrophic floods. Where landslides engulfed entire villages, in some places entire houses were destroyed. The ashes of the people's world turned to rangoli. During this difficult time, various women's organizations in Nagpur came to the rescue. Last month, they helped by distributing three to four tons of household goods, utensils, clothes and sarees in the Konkan. He handed over a check of Rs 10,000 for the students of Konkan to Prakash More, President of Konkan Republican Social Organization. The help was given to the students for distribution of books and pens. Janajagruti Mahila Mandal president Varsha Meshram promised to send more help to the children.

President Varshatai Meshram deliberately came to Mumbai from Nagpur to hand over the check for the students and handed it over to Prakash More, Deepak Pawar, President of Konkan Republican Social Organization at Kapilvastu Buddha Vihara. Ministry journalist Baba Ramteke was present on the occasion. Prakash More thanked Varshatai Meshram, Vaishali Bambole, Mamta Gedam, Ushatai Patil, Sangeeta Temburne, Lata Ramteke, Deepti Naik, President of All Women's Circles of Nagpur.

ليست هناك تعليقات