Breaking News

विद्यार्थ्यांचे जीवन तुटलेल्या पानासारखे : महानाग रत्न


जाईबाई चौधरी ज्ञानपीठात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


जाईबाई चौधरी ज्ञानपीठात  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना  मान्यवर 


नागपूर : विद्यार्थ्यांचे जीवन तुटलेल्या झाडाच्या पानासारखे असते जिकडे हवा असली तिकडे उडत असते, शिक्षण घेत असताना  झाडाच्या खोडा प्रमाणे  एकच  तत्वाचे पालन करीत विद्यार्थ्यांनी  कुठल्या क्षेत्रात काम करायचा आहे याचे निश्चय करणे गरजेचे आहे तरच  तो आपल्या ध्येय  साध्य करू शकतो. जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  समारंभ कार्यक्रमात प्रबोधनकार लेखक महानाग रत्न विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना  बोलत होते.    
         गोरगरिबांची  शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदर मंगळवारी बाजार येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ  कनिष्ठ महाविद्यालयाचा  वाणिज्य  आणि कला या शाखेतून  एच.एस.सी बोर्डाच्या-२०२१च्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा राखली असून  गुणवंत प्राप्त  विद्यार्थ्यांचा सत्कार  करण्यात आला. 


    कार्यक्रमाचे  प्रमुख  पाहुणे  प्रबोधनकार लेखक   महानाग रत्न, जाईबाई संस्थेचे  सचिव  आचार्य  सुधाकर  चौधरी, प्राचार्य राजेश  अंबुलकर,  जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक  सुदत्त  मेश्राम उपस्थित होते.  कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे  भावी काळात  उज्वल भविष्य  असून जाईबाई चौधरी ज्ञानपीठात  लवकरच  यूपीएसी , एमपीएससी, आयआयटी, स्पर्धा परीक्षेची  नि : शुल्क  शिकवणी वर्ग  सुरू करण्यात येणार असल्याच  संस्थेचे सचिव आचार्य सुधार चौधरी म्हणाले. प्रशासकीय अधिकारी, वकील, बँक, पत्रकारिता, जाहिरात, शिक्षक  आदी  विविध क्षेत्रात  बारावी नंतर तरुणींनी  करिअर  कसा  घडवू शकतील  या विषयी  प्राचार्य राजेश अंबुलकर यांनी  विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. 


 यावेळी  बारावीत वाणिज्य  शाखेतून   मेहवीश  खान ९५ टक्के, शगुन  तुमडाम ९० टक्के, समीक्षा बमनोटे ९२ टक्के , भूमिका लांबाङे ९१ टक्के , विशाखा लेंडे ९१ टक्के, आरती दक्कनवार ९० टक्के, कला शाखेतून अर्पिता आगासे ८३ टक्के, वेदिका कुमरे ८१ टक्के, रितू राऊत ८० टक्के , पलक  बेले ८० टक्के तनुजा राऊत ८० टक्के, रुचिका वालदे ८० टक्के, भारती  कावळे ८० टक्के अश्या गुणवंत प्राप्त  विद्यार्थिनीचा प्रमुख  पाहुण्याच्याहस्ते  पुष्पगुलाब व  बक्षीस देऊन  सत्कार करण्यात आले.  


 विद्यार्थिनींनी मिळविलेल्या  घवघवीत यशाबद्दल कनिष्ठ  महाविद्यालयाच्या  संचालिका प्रभा चौधरी, अशिया  पठाण,  अनिता रोडगे, रूपा काकोटे, अंजली बैतुले  आदी सर्व  कनिष्ठ महाविद्यालयाचा  शिक्षक व  कर्मचारी यांनी  पुढील वाटचालीसाठी  विद्यार्थिनींच्या  अभिनंदन केले.  कार्यक्रमाचे  संचालन प्राध्यपिका अनिता धारगावे , शिक्षिका अश्विनी मोडक  यांनी केले. आभार  प्राचार्य  राजेश अंबुलकर यांनी मानले. 


Jaibai Chaudhary Dnyanpeeth felicitates meritorious students

Nagpur: The life of a student is like a leaf of a broken tree that flies wherever the wind blows. He can achieve his goal only if he decides in which field he wants to work by following the same principle like the trunk of a tree while studying. Prabodhankar writer Mahanag Ratna was speaking while guiding the students in the felicitation ceremony of the meritorious students of Jaibai Chaudhary Jnanpith. This Tuesday, Jaibai Chaudhary Jnanpith Junior College at Bazar, known as the school of the poor, has maintained the tradition of 100 per cent result in the HSC Board-2021 examination in Commerce and Arts and the meritorious students were felicitated. The chief guests of the program were Prabodhankar writer Mahanag Ratna, Secretary of Jaibai Sanstha Acharya Sudhakar Chaudhary, Principal Rajesh Ambulkar, Professor Sudatta Meshram of Junior College. Acharya Sudhar Chaudhary, secretary of Jaibai Chaudhary Jnanpith, said that free tuition classes for UPAC, MPSC, IIT and competitive examinations would be started soon. Principal Rajesh Ambulkar gave special guidance to the students on how youngsters can pursue a career after 12th in various fields like administrative officer, lawyer, bank, journalism, advertisement, teacher etc. Mehvish Khan 95 per cent, Shagun Tumdam 90 per cent, Samiksha Bamnote 92 per cent, Bhumika Lambange 91 per cent, Visakha Lande 91 per cent, Aarti Deccanwar 90 per cent, Arpita Agase 83 per cent, Vedika Kumre 81 per cent and Ritu Raut 80 per cent. , Palak Bele 80 per cent Tanuja Raut 80 per cent, Ruchika Valade 80 per cent, Bharti Kavale 80 per cent were felicitated with flowers and prizes by the chief guest. Prabha Chaudhary, Director, Junior College, Asiya Pathan, Anita Rodge, Rupa Kakote, Anjali Baitule, all the teachers and staff of the junior college congratulated the students for their success. The program was conducted by Professor Anita Dhargave, Teacher Ashwini Modak. Thanked by Principal Rajesh Ambulkar.



ليست هناك تعليقات