कराटे कोकुसाई फेडरेशनतर्फे सावित्रीबाई फुले जयंती
![]() |
नागपूर,ता.३ : उत्तर नागपुरातील पंचशील नगर येथील मुक्तदेव बहुउद्देशीय विकास संस्था आणि
कराटे कोकुसाई इंडिपेंडेंट फेडरेशन इंडिया
यांच्या संयुक्त विद्यमाने
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त कॉर्पोरेशन वाचनालयाचा पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण स्मारक समितीचे अध्यक्ष इंद्रपाल वाघमारे,सचिव विशाल जनबंधू,
सामाजिक कार्यकर्ता ऍड. विलास राऊत, एन७ न्यूज व्हॉइसचे सहसंपादक कोमल राऊत, कराटे कोकुसाई इंडिपेंडेंट फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष रविकांत मेश्राम, उपाध्यक्ष
एम. सिद्धार्थ, सचिव अमित शेंडे, कोषाध्यक्ष श्रीकांत मेश्राम,
स्टार राष्ट्रीय खेळाडू पवन येवले,
पत्रकार निलेश राऊत,
पालकांचे प्रतिनिधी
दिनेश कोचे उपस्थित होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
मान्यवराकडून
अभिवादन करण्यात आले.
वाढते अत्याचार, शोषण यांच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वतःचा बचाव कसा करायचा यावर प्रात्यक्षिका सादर करीत विद्यार्थिनी व चिमुकल्यांकडून
आत्मनिर्भरतेचे संदेश दिला.
कोरोनाच्या काळात विविध संघटनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय ९ देशांच्या ऑनलाईन सहभाग झालेल्या कराटे टूर्नामेंट स्पर्धेत कलश गोंडाणे या विद्यार्थिनी सुवर्ण पदक पटकावून देशाचे नाव मोठे केले याबद्दल कराटे कोकुसाई इंडिपेंडेंट फेडरेशन इंडिया यांच्याकडून पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
कॉर्पोरेशन वाचनालयाचा पटांगणावर कराटे प्रशिक्षण केंद्राच्या नवीन शाखेचे उदघाटन करण्यात आले असून नागरिकांनी प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी असे आवाहन श्रीकांत मेश्राम यांच्या कडून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन अक्षय चवरे यांनी केले. आभार जयश्री सहारे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ليست هناك تعليقات