Breaking News

सहपोलिस आयुक्त अस्वती दोर्जे यांच्याहस्ते महिला रॅलीचे उदघाटन

 जनजागृती रॅलीचा  सहपोलिस आयुक्त अस्वती दोर्जे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ 

नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या अधिनस्थ असलेल्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशन, नागपूर विभागीय रेल्वे मंडळ, मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने अजनी रेल्वे स्टेशन येथे आयोजित केलेल्या महिला दिन जनजागृती रॅलीचा  सहपोलिस आयुक्त अस्वती दोर्जे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.  
यावेळी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे सहायक संचालक हंसराज राऊत, अजनी रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापक माधुरी चौधरी, धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे एनसीसीचे डॉ. शुभाष दाढे, एनएसएसचे राजकुमार गिरी गोस्वामी, मास कम्युनिकेशनचे नितीन कराळे, धंतोली पोलिस स्टेशनचे महिला सहायक पोलिस निरीक्षक वाकडे, पोलिस उपनिरीक्षक धगे, गाठे, रंगधुन कला मंचचे समीर दंदाळे यांच्यासह इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
यावेळी रॅलीत रंगधुन कलामंचाच्या महिला कलापथक व बॅंडपथकाने ढोलताश्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण केले. 
या रॅलीत रेल्वेतील महिला अधिकारी, कर्मचारी, नागपूर शहर पोलिस दलातील महिला अधिकारी, कर्मचारी, रंगधुन कला मंचाचे कलापथक व महिला बॅंडपथक, एनएसएस धनवटे नॅशनल महाविद्यालय, एनएसएस पी.डब्लू.एस. महाविद्यालय, एनसीसी धनवटे नॅशनल महाविद्यालय असे सुमारे १५० अधिकारी, कर्मचारी,विद्यार्थी सहभागी झाले होते.

Inauguration of Women's Rally by Joint Commissioner of Police Aswati Dorje

Nagpur :  Joint Commissioner of Police for Women's Day Awareness Rally at Ajni Railway Station jointly organized by Ministry of Information and Broadcasting, Regional Public Relations Bureau under the Regional Public Relations Bureau, Government of India, Nagpur and Ajni Railway Station, Nagpur Divisional Railway Board, Central Railway. Aswati Dorje launched with a green flag.
Hansraj Raut, Assistant Director, Regional Public Relations Bureau, Madhuri Chaudhary, Manager, Ajni Railway Station, Mahesh Chavan, Senior Inspector of Police, Dhantoli Police Station, Rampal Badpagga, Public Relations Officer, Railways, Dr. Shubhash Dade, Rajkumar Giri Goswami of NSS, Nitin Karale of Mass Communication, Women Assistant Inspector of Police Wakde of Dhantoli Police Station, Sub-Inspector of Police Dhage, Gathe, Sameer Dandale of Rangdhun Kala Manch and other officers were present.
During the rally, Rangdhun Kalamancha's women's troupe and band performed the program through drums.
The rally was attended by women officers of Railways, staff, women officers of Nagpur city police force, staff, art troupe of Rangdhun Kala Manch and women's band, NSS Dhanwate National College, NSS PWS. The college, NCC Dhanwate National College was attended by about 150 officers, staff and students.

   

ليست هناك تعليقات