ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रात भव्य जॉब कार्ड, कृषी मेळावा
आत्मसमर्पितांसाठी असलेली "नवजीवन योजनेत " नक्षल सदस्य असलेल्या कुटुंबियांना आत्मसमर्पण करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे याबाबत आवाहन करण्यात आले..
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन अंतर्गत ग्यारापत्ती
पोलीस मदत केंद्र येथील ग्यारापत्तीच्या पटांगणावर
भव्य जॉब कार्ड व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्याकरीता उद्घाटक ग्रामपंचायतचे सरपंच पुरनसाय कुमरे, प्रमुख पाहुणे ग्यारापत्ती सीआरपीफचे रवी गणवीर, धानोरा एसबीआय बँकचे मोरेश्वर शेंडे, गावपाटील ग्यारापत्ती, मोठाझेलिया कार्यक्रमाला उपस्थित होते. गडचिरोली पोलीस अधिक्षक अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) कलवाणीया साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) शेख साहेब,
धानोरा
उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जॉब कार्ड व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा या थोर महापुरूषांच्या प्रतीमांना पुष्पहार घालुन दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.
आपला भारत देश कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतीच्या उत्पादनात कश्या प्रकारे वाढ करता येईल त्या करिता आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी. पोलीस प्रशासनामार्फत ५०% सवलतीच्या दराने
विविध जातीच्या भात बियाणांची
वाटप करण्यात येतात. जॉब कार्डचे महत्व समजावून त्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे याबद्दल नागरिकांना पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी माहिती दिली.
संजय गांधी योजन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, कन्यांच्या कल्याणासाठी सुरणासाठी योजना, जीवन ज्योती विमा योजना, आदीवासी विकास विभागाच्या योजना, जात प्रमाणपत्र, पोमके ग्यारापत्ती येथे या सर्व योजनांच्या माहितीकरिता व लाभ घेण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या "दादालोरा खिडकी" बाबत पोलीस उपनिरीक्षक आठवे यांनी माहिती दिली.
नक्षल सदस्य असलेल्या कुटुंबियांना आत्मसमर्पितांसाठी असलेली "नवजीवन योजना" बाबत माहिती देऊन नक्षल सदश्यांना आत्मसमर्पण करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे याबाबत आवाहन पोलीस उपनिरीक्षक पोफळे यांनी केले. सुशिक्षित बेरोजगारांसाठी पोलिस विभागा मार्फत राबविण्यात येत असलेले आटोमोबाईल, संगणक , हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग, प्रशिक्षण बाबत माहिती देऊन आजपर्यंत या उपक्रमातून गडचिरोली जिल्यातील बेरोजगार युवकांना मिळालेल्या रोजगराबाबत पोलीस निरीक्षक पाटील यांनी माहिती दिली.
एसबीआय बँकेचे कर्मचारी मोरेश्वर शेंडे यांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असण्याचे विविध फायदे सांगून 29 नागरिकांचे टायनी प्रकारचे बँक खाते काढून दिले. तसेच उपस्थित नागरिकांना शेतीउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोमके ग्यारापत्ती येथील सर्व अधिकारी/ अंमलदार यांनी मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस अंमलदार साजन मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाला गावातील महिला, विद्यार्थिनी नागरीक उपस्थित होते.
Grand job card, agricultural meet at Gyarapatti Police Help Center
Gadchiroli: Under the Gadchiroli District Police Administration, a grand job card and agricultural fair was organized at Gyarapatti Patangana at Gyarapatti Police Help Center. The inaugural Gram Panchayat Sarpanch Devsur, Chief Guest Gyarapatti CRPF's Ravi Ganveer, Dhanora SBI Bank's Moreshwar Shende, Gavpatil Gyarapatti, Mothazelia were present on the occasion.
Under the guidance of Gadchiroli Superintendent of Police Ankit Goyal Saheb, Upper Superintendent of Police (Campaign) Kalwaniya Saheb, Upper Superintendent of Police (Administration) Sheikh Saheb, Dhanora Sub-Divisional Police Officer Jadhav Saheb, a grand job card and agricultural fair was organized. The program began with Dr. Babasaheb Ambedkar, Birsa Munda and other great personalities were laid wreaths and lamps were lit.
As our country is an agricultural country, how to increase agricultural production in a modern way. Various varieties of paddy seeds are distributed by the police administration at a 50% discount. Explaining the importance of job card, Sub-Inspector of Police Shelke informed the citizens about the required documents.
For information on Sanjay Gandhi Yojana, Indira Gandhi National Old Age Retirement Scheme, Indira Gandhi National Widow Scheme, Shravan Bal Seva Rajya Nivruti Vetan Yojana, Suranashatya Yojana for Girls Welfare, Jeevan Jyoti Vima Yojana, Tribal Development Department Schemes, Caste Certificate, Pomke Gyarapatti Sub-Inspector of Police Athave informed about the "Dadalora window" which was started for the benefit of the people. Sub-Inspector of Police Pophale appealed to the people to cooperate with the Naxal members by informing them about the "Navjivan Yojana" for the surrender of the families of the Naxal members. Police Inspector Patil informed about the employment provided to the unemployed youth in Gadchiroli district through this initiative.
Moreshwar Shende, an employee of SBI Bank, removed the Tiny type bank accounts of 29 citizens, citing various benefits of having an account in a nationalized bank. Agricultural materials were also distributed to the citizens present. All the officers / officials at Pomke Gyarapatti played a vital role in making this meet a success. The program was moderated by Police Officer Sajan Meshram. The program was attended by women and students of the village.
ليست هناك تعليقات