पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते चार्ली व्हॅनचे लोकार्पण
नागपूर शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये तसेच गस्तीमध्ये एक मैलाचा टप्पा ओलांडला आहे. शहराच्या ३३ पोलीस ठाण्याअंतर्गत ह्या चार्ली वाहनांवर असलेले पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणार आहे.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते चार्ली व्हॅनचे लोकार्पण
नागपूर, ता. १४ - नागपूर शहर पोलीस दलात चार्ली व्हॅन दाखल झाल्याने नागरिकांची सुरक्षितता व पोलीस गस्त अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या चार्ली व्हॅनचा लोकार्पण सोहळा आज शहर पोलीस #nagpurpolice मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडला. चार्ली व्हॅनला फ्लॅग ऑफ करून डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ही सर्व वाहने आज नागपूर शहर पोलीस दलात दाखल झाली. जिल्हा नियोजन समिती कडून 1 कोटी 64 लाख 49 हजार इतका निधी डॉ.नितीन राऊत पालकमंत्री यांनी उपलब्ध करून दिला. या निधीतून
नागपूर शहर पोलीस आयुक्तालया करिता 72 होन्डा शाईन दुचाकी वाहने, 14 महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. सदर वाहनाचा वापर चार्ली पेट्रोलींग व पोलीस ठाणे दैनंदिन कामाकरिता वापर करणार आहे. यावेळी आमदार राजू पारवे व पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, चार्ली व्हॅन दाखल झाल्याने नागपूर शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये तसेच गस्तीमध्ये एक मैलाचा टप्पा ओलांडला आहे. शहराच्या ३३ पोलीस ठाण्याअंतर्गत ह्या चार्ली वाहनांवर असलेले पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणार आहे. या पोलिसांना वेगळी ओळख देण्यासाठी या पोलीस जवानांचा वेगळा ड्रेस कोड तयार केला आहे. महिलांची छेडछाड तसेच नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाची तात्काळ माहिती या पोलीस जवानांकडून पोलीस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित पोलीस ठाण्यांना मिळणार आहे. यासाठी शहराच्या ११६ बिटमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संदेशवहनासाठी या पोलीस जवानांकडे अत्याधुनिक उपकरणे राहणार आहे. यात फ्लॅश लाईट, सायरन व पी. ए. सिस्टमचा समावेश आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये निश्चितपणे वाढ होणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
शहरातील अभिलेखावरील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर, हद्दपार इसमांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी, गदीर्चे ठिकाणी सतत पेट्रोलींग करण्यासाठी आणि नागरीकांनी दिलेल्या तकारीबाबत योग्य दक्षता घेवून वेळीच कारवाई करण्यासाठी या चार्ली व्हॅन आणि वाहनांचा उपयोग होणार असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे नवे पाऊल जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाभदायक ठरेल असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. पोलीसांसाठी नागरिकांची सुरक्षितता ही पहिल्या प्राधान्य क्रमावर आहे. चार्ली व्हॅनमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये निश्चितपणे वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्यासह शहरातील पोलीस उपायुक्त उपस्थित होते.
Indian National Congress-Maharashtra
Nagpur North Vidhansabha Youth Congress
Nagpur Police Commissionerate
Nagpur District Congress Committee
#nagpur
With the entry of Charlie Van in the Nagpur City Police Force, the security of the citizens and the police patrol will be strengthened, asserted the Guardian Minister of Nagpur District, Dr. Performed by Nitin Raut.
ليست هناك تعليقات