Breaking News

‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन


‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन करतांना  नाथे पब्लिकेशनचे संचालक संजय नाथे, नाग स्वराज फाऊंडेशनचे सचिव हितेश डोर्लीकर व इतर मान्यवर         

नागपूर, ता.२३ : प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुरातील तरुणांनी  राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी “नाग स्वराज फाऊंडेशन” आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन  करण्यात आले. 

नाग स्वराज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारा २०१० पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने,शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलते. २६ जानेवारी व १५ ऑगस्ट  या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ घेवून फिरतात व ते कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून नाग स्वराज फाऊंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रीय ध्वज उचलून सांभाळण्याचे कार्य करीत आहेत.

 'करा सम्मान तिरंग्याचा’ हा उपक्रम चांगला  आहे, या उपक्रमात तरूणांनी सहभाग घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा,असे आवाहन नाथे पब्लिकेशनचे संचालक संजय नाथे यांनी केले.

 दिनांक २३ ते २७ जानेवारी २०२१ या कालावधीत जनजागृती अभियान सुरु होत आहे. या अभियानाच्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविदयालयामध्ये स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची माहिती व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

या प्रकाशन समारंभाला नाग स्वराज फाऊंडेशनचे सचिव हितेश डोर्लीकर, पौर्णिमा वराडे, अश्विनी पारधी,हर्षा डोर्लीकर, प्रो.डॉ. विनायक साखरकर, हर्षद हरणे ,यज्ञेश कपले, दिव्या राहाटे, हेमंत पराते व इतर युवा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ليست هناك تعليقات