इंदोरामध्ये रक्तदान शिबीर
![]() |
नगरसेविका स्नेहा निकोसे सोबत तरुणमंडळी रक्तदान करतांना |
नागपूर: कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात रक्ताची कमतरता असल्याचे लक्षात घेत इंदोरा परिसरातील क्रांती ज्योती सावित्री फुले जयंती निमित्त "समता सैनिक दलाच्या व नई उड्डान बहुउद्देशीय संस्था" यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीरचे आयोजित करण्यात आले होते.
भगवान बुद्ध, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्री फुले यांच्या प्रतिमेला विनोद वालादे , नगरसेविका स्नेहा निकोसे यांच्याहस्ते
माल्यार्पण
करण्यात आले.
यावेळी नागपूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ग्रुप व आरोग्य शिबीर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या गटाने सेवा कार्यात विशेष योगदान दिले.
शिबीरीरात परिसरातील अनेक तरुण व महिलांनी रक्तदान केले. या प्रसंगी, महानगरपालिकेच्या मंगळवारी झोन येथील नगरसेविका स्नेहा निकोसे यांनीही रक्तदान करून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देशात रक्तदान कमी होत असल्यामुळे तरुणांनी रक्तदान करा, देश सेवेत योगदान द्या असे आवाहन केले.
यावेळी विनोद वालदे , स्नेहा निकोसे, मुकेश उके, रवी गोंडाणे, अक्षय गजभिये, नितेश गोंडाणे , विवेक निकोसे, राजेश वालदे, निशांत सहारे, नवीन अंबाडे, अंकुश उके, दीपक बागडे, सागर बागडे, रुनाग गजभिये, लंकेश सहारे, कपिल , उदय गोंदाणे, तारिक रॉडगे, संस्कार वालडे, उज्वल गजभिये, साहिल रंगारी, वैभव वलादे आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
ليست هناك تعليقات