Breaking News

हंसकृपा स्कुलमध्ये बालक दिन संपन्न

  

बालक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर


नागपूर :  कोराडी महामार्ग बंधूनगर येथील हंसकृपा इंग्लिश प्रायमरी स्कुलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने झाली. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला  माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक  डी.जी. जिचकार, संचालिका निलीमा जिचकार, मुख्याध्यापिका रुपाली जवंजाळ , मोनिका जिचकार,  योगिता वाट , रंजना घायवट , प्रीती मंथनवार, संतोषीनी मुलमुले, सारीका बनकर , शितल दुबे, कविता धोटे, रक्षा साबळे, भांगे मॅडम, सर्व शिक्षक वृंद आदि उपस्थित होते. विदयार्थ्यानी गीत, भाषणे सादर केली.  कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रक्षा साबळे यांनी केले.  आभार  कविता धोटे  यांनी मानले. 

ليست هناك تعليقات