आदर्श गाव योजनेतून गावाचा सर्वांगीन विकास शक्य : कुलगुरू डॉ. शरद गडाख
स्त्री वर्गाने पुढाकार घेण्याचे आव्हान : कुलगुरू डॉ. शरद गडाख
![]() |
| कुलगुरू डॉ. शरद गडाख |
नागपूर : गावा-गावात चैतन्य फुलविण्यासाठी ग्रामिण भागात उत्पादित होणाऱ्या शेती आणि शेती पुरक उत्पादनांवर, गाव पातळीवर प्रक्रिया करणे गरजेचे असून प्रत्येक गाव आदर्श होण्यासाठी सर्व शासकिय, निमशासकिय, खाजगी संस्थाने एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन करीत यामध्ये स्त्री वर्गाने पुढाकार घेण्याचे आव्हान डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी गावकऱ्यांना केले.ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आदर्श गाव योजनेअंतर्गत ग्राम सालईमेन्ढा येथे (ता.३) खरीप आढावा बैठकीत बोलत होते.
सदर बैठकिच्या उद्घाटन प्रसंगी अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, नागपूर कृषि महाविद्यालयचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविन्द्र मनोहरे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, नागपूर रेशीमचे उपसंचालक महेंद्र ढवळे,जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी संजय पिंगट, महाबिज जिल्हा व्यवस्थापक गणेश चिरूटकर, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. अश्वीन मेश्राम, सालईमेन्ढाचे सरपंच कल्पना मारोती हजारे, उपसरपंच योगीराज चौके उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले, संकल्पनेचा मुख्य उद्देश गावाला आदर्शगाव बनविणे व त्याचा विकास करणे, कृषि उत्पादन दुप्पट करण्याकरीता कृषि तंत्रज्ञानाचा उपयोग शेती मध्ये करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याकरीता त्री-सुत्री- पध्दती बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये उन्नत वाण व चांगले व्यवस्थापन करून उत्पादकता वाढवल्यामुळे ३३ टक्यापर्यंत उत्पन्न वाढवता येते. दुसरे सुत्र यांत्रिकीकरणामुळे ५० टक्यापर्यंत उत्पादन खर्च कमी केल्यामुळे ३३ टक्यापर्यंत उत्पन्न वाढवता येते आणि तिसरे सुत्र म्हणजे योग्यवेळी कापणी, चांगले विपनन, किमाण प्रक्रिया व पॅकेजिंग करून ३३ टक्यापर्यंत उत्पन्न वाढवता येईल. अशा प्रकारे त्री-सुत्री कार्यक्रमामुळे शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करू शकेल असे नमुद केले. तसेच विद्यापीठात विकसीत झालेल्या विविध तंत्रज्ञान व पिकांचे वाण यांच्या बद्दल माहिती दिली व त्यांच्या बद्दल शेतकऱ्यांना अवगत करून दिले आणि येत्या काळात उत्कृष्ठ शेतीसाठी या तंत्रज्ञानाची जास्त गरज आहे असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.
डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण यांनी विदर्भातिल अकरा जिल्हयांमध्ये राबविण्यात येत असणान्या आदर्श गाव योजना तसेच शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि पी.डी.के.व्ही. आयडल्स सारख्या महत्वकांक्षी विस्तार प्रकल्पाची माहिती देऊन विद्यापीठ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचले असल्याची माहिती दिली.
सहयोगी अधिष्ठाता, डॉ. प्रकाश कडू, कृषि महाविद्यालय, नागपूर यांनी उपस्थित पाहुण्यांना सालईमेन्ढा या आदिवासी बहूल गावाचा परीचय करून दिला. यामध्ये या गावाची सामाजिक व आर्थिक संरचना, कृषि व इतर सलग्न माहिती ही महाविद्यालयाने केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारे सांगितली व या गावात पुढील नियोजन कसे राहिले हे विषद केले.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक श्री. रविन्द्र मनोहरे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर यांनी शेतकऱ्यांनी गट संघटन करावे व शासनाच्या विविध योजनांचा पुरेपुर लाभ घेण्यात यावा जेणेकरून आपण सालईमेन्डा हे गाव आदर्शगाव करू. डॉ. अर्चना कडू, प्रकल्प संचालक आत्मा, यांनी आत्मा काय आहे, त्याचे कार्य काय आहे व त्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा ग्रामिण महिलांनी उपयोग करून घ्यावा व शेतकन्यांनी "एक गाव एक वाण" असा पिकपध्दतीत वापर करावा असे मनोगत व्यक्त केले. श्री. महेन्द्र ढवळे, उपसंचालक रेशीम, नागपूर यांनी शेतकऱ्यांना तुतीची लागवड व त्याचे फायदे, त्याचप्रमाणे श्री. संजय पिंगट, कृषि विकास, अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी अनुसूचित जमातीच्या शेतकन्यांकरीता राबविल्या जाणान्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच श्री. गणेश चिरूटकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज नागपूर यांनी महाबिज मार्फत राबविल्या जाणाऱ्या पिक प्रात्यक्षिके व बिजोत्पादन बद्दल माहिती दिली. डॉ. अश्वीन मेश्राम, पशुसंवर्धन विकास अधिकारी, हिंगणा, नागपूर यांनी कुक्कुटपालन व पशुसंवर्धना बद्दल माहिती आपल्या मनोगता मार्फत दिली. सौ. कल्पना मारोती हजारे, सरपंच व श्री. योगीराज चौके उपसरपंच, यांनी सालईमेन्हा हे आदर्श गाव योजनेसाठी निवडल्याबद्दल कृषि महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले आणि सर्व गावकऱ्यांचे सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.
मृद रसायनशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर अंतर्गत माती परिक्षण अहवाल शेतकन्यांना या प्रसंगी देण्यात आले. तसेच कृषि विभागाने तुरीचे आणि तृणधान्य बियाणे किट म्हणून शेतकऱ्यांना कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते देण्यात आले.सुत्रसंचालन नागपूर विस्तार शिक्षणचे प्राध्यापक डॉ. मिलींद राठोड यांनी केले. आभार डॉ. विनोद खडसे, कृषि विद्यावेत्ता तसेच या योजनेचे समन्वयक यांनी मानले. याप्रसंगी कृषि महाविद्यालय, नागपूर येथील शिक्षकवृंद तथा पुरूष व महिला शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.


No comments